new sarkari yojana- लाडकी बहीण या योजनेमध्ये नवे ७ बदल

new sarkari yojana  माझी लाडकी बहीण ही जी योजना महाराष्ट्र सरकारने राबविण्यात आलेले आहे या योजनेमध्ये दोन जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे पण माझी बहीण लाडकी योजना यामध्ये सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत ते सात मोठे बदल खालील प्रमाणे आहेत.

मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात काही निवेदन दिलेले आहे तर ते खालील प्रमाणे आहे.
सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. 

नवीन शासकीय योजना साठी ग्रुप जॉइन करा

  • या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या भारतीय महिलांना दिनांक एक जुलै 2024 पासून दर महिन्याला पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणती ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • सदर योजनेतून पाच एकर शेतीचे अट वगळण्यात आलेली आहे सुरुवातीला ज्या महिलेचा कुटुंबात जर पाच एकर शेती असेल तर ती महिला अपात्रता म्हणून होते पण आता ही अट वगळण्यात आलेली आहे आणि हा एक नवा बदल करण्यात आलेला आहे आता तुमची पाच एकर पेक्षा जास्त तरी जमीन असेल तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • पर राजा जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • रुपये अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल.
  • सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे.

तरी या माझी लाडकी बहिणी या योजनेचे हे सात मोठे बदल आज करण्यात आलेले आहे सुरुवातीला पात्र महिलांसाठी काही नियम आखले होते व अपात्र महिलांसाठी नियम होते पण आज दिनांक 2 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचे निवेदन आलेले आहे.

ज्यामध्ये त्यांनी म्हटलेले आहे की वयाची अट वाढवण्यात आलेली आहे तसेच जमिनीच्या बाबतीत जो काही नियम होता त्यामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे तसेच काही कागदपत्रांची गरज राहिली नाही बरेचसे कागदपत्र वगळण्यात आलेले आहे अशाप्रकारे हे सात बद्दल मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानुसार करण्यात आलेले आहे

Leave a Comment