new yojana update2024- लाडकी बहीण योजना पात्र व आपत्र महिला

new yojana update2024 मुख्यमंत्री योजनेअंतर्गत माझी लाडकी बहीण ही नवीन योजना राबविण्यात आली आहे या योजनेनुसार महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
ही योजना आत्ता नवीनच राबविण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील महिलांना प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये सरकार जमा करणार आहे.

नवीन शासकीय योजना साठी ग्रुप जॉइन करा

माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील सर्वच महिलांना नाही ही एका वयोगटांनुसार पात्र असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे ज्या या योजनेच्या वयोगटांमध्ये ज्या महिला बसतील तर त्याच महिलांना या योजनेअंतर्गत महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत.
माझी लाडकी बहीण या योजनेत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार या अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
माझी लाडकी बहीण या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील त्यांची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे.
लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला

पात्रता पुढीलप्रमाणे

  • लाभार्थी महिलेचे वय हे 21 किंवा 21 च्या पुढे असणे आवश्यक आहे आणि वय वर्ष 60 च्या आत मध्ये असणे आवश्यक आहे
  • सदर योजनेमध्ये जी महिला लाभार्थी असणार आहे त्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखापेक्षा जास्त नसावी

वरील दिल्याप्रमाणे महिला या सर्व गटात बसत असेल तर ती महिला माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

तर अपात्र कोण ठरणार आहे याची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे. खाली दिलेल्या नियमानमध्ये एखादी महिला बसत नसेल तर त्या महिलेला या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही.

अपात्रता पुढीलप्रमाणे

  • त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख 50 हजार पेक्षा जास्त असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी असतील किंवा सेवानिवृत्त होऊन सेवानिवृत्त वेतन घेत असतील तर त्यांच्या घरातील सदस्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
  • सदर महिलेने शासनाच्या विविध विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा १५०० रुपये पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार असेल
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  • ज्यांच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी वाहने सदस्याच्या नावावर असतील तर त्यांना अर्ज करता येणार नाही.

तर अशा प्रकारे पात्रता आणि अपात्रता वरील प्रमाणे यादी दिलेली आहे.
तुमच्या घरातील सदस्य पात्रता यादी मध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि जर अपात्रता यादीमध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही.

सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment